मराठी चालू घडामोडी mpsc करणाऱ्या मुलांसाठी खास

By Sandypummy12

मराठी चालू घडा मोडी | Marathi Current Affairs

Marathi Current affairs :- आज आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या साठी काही current afiers बद्दल मागील वर्षातील चालू घडामोडी बद्दल लेख आणला आहे तुम्हाला मागील वर्षांच्या काही चालू घडामोडी बद्दल सांगत आहोत तुम्हाला आमचा हा लेख आजून वाचायचा असेल तर या त आम्ही आजून पण काही बद्दल करू ईचीत आहे

Marathi Current affairs

लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यानेच सीमेवर पेच- जयशंकर. Marathi Current affairs

सीमेवर सैन्य गोळा न करण्याबाबत झालेल्या लेखी करारांकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. चीनच्या या कारवाया संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी ‘सयुक्तिक चिंतेचा’ विषय बनला असल्याचेही ते म्हणाले.

अमेरिकेचे अँटनी ब्लिंकन, जपानचे योशिमासा हायाशी व ऑस्ट्रेलियाचे मारिसे पेन या ‘क्वाड’ देशांच्या समपदस्थ परराष्ट्र मंत्र्यांसोबत जयशंकर यांनी शुक्रवारी चर्चा केली आणि हिंदू- पॅसिफिक क्षेत्र ‘बळजबरी’ पासून मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पूर्व लडाख सीमेवरील तिढय़ाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर बोलत होते.

 ‘क्वाड’ परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत भारत- चीन संबंधांबाबत चर्चा करण्यात आली, कारण आमच्या शेजारी काय घडामोडी सुरू आहेत याबाबत आम्ही एकमेकांना माहिती देण्याचा तो भाग होता, असे जयशंकर संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.

सीमेवर सैन्याची जमवाजमव करू नये या भारतासोबत २०२० साली केलेल्या लेखी कराराकडे चीनने दुर्लक्ष केल्यामुळेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एखादा मोठा देश अशा प्रकारे लेखी वचनबद्धतेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सयुक्तिक काळजीचा मुद्दा असतो असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

५४ चिनी अ‍ॅपवर केंद्र सरकारची बंदी

भारतीय सुरक्षेला बाधक ठरणाऱ्या ५४ चिनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोमवारी घेतला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाने या अ‍ॅपवर Marathi Current affairs भारतात बंदी घालण्याची औपचारिक अधिसूचना जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा, म्युझिक प्लेअर, म्युझिक प्लस, व्हॉल्यूम बूस्टर, व्हिडीओ प्लेअर मीडिया, विवा व्हिडीओ एडिटर, Marathi Current affairs नाइस व्हिडीओ बायडू, अ‍ॅपलॉक, अ‍ॅस्ट्राक्राफ्ट यासंह विविध अ‍ॅपचा समावेश आहे.

चिनी मोबाइल अ‍ॅपवर दुसऱ्यांदा कारवाई करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जून २०२१मध्ये सरकारने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. टिकटॉक, यूसी ब्राऊझर, वुईचॅट, बिगो लाइव्ह यांसह विविध अ‍ॅपचा यामध्ये समावेश होता. हे अ‍ॅप देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व यांस प्रतिकुल असल्याचे त्यावेळी सरकारने सांगितले होते.

युक्रेनचे अध्यक्ष रशियाबाबत निर्धास्त, पण अमेरिकेचे इशारे सुरूच

युक्रेनवर रशिया हल्ला करण्याची शक्यता आहे, असे इशारे अमेरिका आदी मित्रराष्ट्रांकडून वारंवार दिले जात असले तरी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी ते गांभीर्याने घेतलेले नाही. रशियाचे आणखी काही सैनिक युक्रेनच्या सीमेनजीक आल्याचे रविवारी अमेरिकेने म्हटले असले तरी, रशियाच्या अशा हेतूबाबत अद्याप ठोस पुरावा दिसून येत नाही, असे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी त्यांची युक्रेनच्या सीमाभागातून होणारी उड्डाणे रद्द केली आहेत, किंवा त्यांचा मार्ग बदलला आहे.

रशियाच्या फौजांनी युक्रेनभोवती तीन बाजूंनी जमवाजमव केली असून हा एका लष्करी सरावाचा भाग आहे, असे रशियाचे म्हणणे आहे. या स्थितीत युक्रेनच्या नागरिकांनी शांत राहावे, असे झेलेन्सकी सातत्याने सांगत आहेत.  गेल्या आठवडाभरापासून रशियाच्या या हालचालींबाबत अमेरिकेचे अधिकारी युक्रेनला सावधगिरीचा इशारा देत आहेत. येत्या आठवडय़ाच्या आतच रशियाचे युक्रेनवर आक्रमण होईल, असा त्यांचा दावा आहे. पण तो मानण्यास झेलेन्सकी उघडपणे तयार नाहीत.

गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, युक्रेनवर बुधवारी रशिया चाल करणे अपेक्षित आहे.

Marathi Current affairs पिनाका-ER अग्निबाणाची चाचणी यशस्वी

पिनाका एक्स्टेंडेड रेंज (पिनाका-ER) मल्टी बॅरल अग्निबाण प्रक्षेपण प्रणाली’ची 11 डिसेंबर 2021 रोजी पोखरण क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE, पुणे) आणि उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा (HEMRL, पुणे) या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे ही प्रणाली विकसित केली आहे.

या चाचण्यांमध्ये, अद्ययावत श्रेणीतील पिनाका अग्निबाणांची विविध क्षमतांसह चाचणी घेण्यात आली. चाचणीची सर्व उद्दिष्टे समाधानकारकपणे पूर्ण झाली. अचूकता आणि सुसंगततेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी 24 अग्निबाण डागण्यात आले.

यावेळी, पिनाका अग्निबाणासाठी स्वदेशी-विकसित प्रेरण फ्यूजचीही चाचणी घेण्यात आली. DRDO-ARDE पुणे या संस्थेने पिनाका अग्निबाणासाठी विविध प्रकारच्या उपयोजनांसाठी वेगवेगळे फ्यूज विकसित केले आहेत.

‘पिनाका’ अग्निबाण..

पिनाका अग्निबाण प्रणाली ही संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेली स्वदेशी बनावटीचे ‘मल्टी बॅरेल’ अग्निबाण प्रणाली आहे.हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गाइडेड अग्निबाण आहे.

‘पिनाका मार्क 1’ची मारक क्षमता 40 किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क 2’ची मारक क्षमता 75 किलोमीटरपर्यंत आहे.

2 UNESCOच्या ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’च्या प्रातिनिधिक यादीमध्ये ‘कोलकाता मधील दुर्गा पूजा’ याचा समावेश.

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) त्याच्या ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’च्या प्रातिनिधिक यादीमध्ये भारतामधील पश्चिम बंगाल राज्यातच्या ‘कोलकाता मधील दुर्गा पूजा’ या उत्सवाचे नाव जोडले.

दुर्गापूजा हा केवळ स्त्रीत्वाचा उत्सव नाही तर नृत्य, संगीत, कला, विधी, पाककला आणि सांस्कृतिक पैलूंची परिपूर्ण अभिव्यक्ती आहे. हा सण जात, पंथ आणि आर्थिक वर्गाच्या सीमा ओलांडतो आणि लोकांना त्याच्या उत्सवात सहभागी करतो.

ठळक बाबी..

UNESCOच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या संरक्षणासाठी 2003 या वर्षाच्या संमेलनाच्या आंतर-सरकारी समितीने 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित केलेल्या 16 व्या संमेलनात मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या प्रातिनिधिक यादीमध्ये या उत्सवाचा समावेश केला.

कोलकाता येथील दुर्गापूजेच्या समावेशासह, भारतामध्ये आता 14 अमूर्त सांस्कृतिक वारसा घटक आहेत, ज्यांचा प्रतिष्ठित UNESCOच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या प्रातिनिधिक यादीमध्ये समावेश झाला आहे.

कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा – महाराष्ट्राला तिहेरी जेतेपद

रांची येथे सुरू असलेल्या १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राने तिहेरी (फ्री-स्टाइल, ग्रीको रोमन, महिला) सांघिक जेतेपद मिळवले. महाराष्ट्राने स्पर्धेत एकूण १९ पदकांची लयलूट केली. यामध्ये सात सुवर्ण, तीन रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश आहे.

फ्री-स्टाइल प्रकारात महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी एकूण चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई करून अग्रस्थान मिळवले. धनराज शिर्के (४४ किलो वजनी गट), पंकज पाटील (४८ किलो), तनिष्क कदम (६२ किलो), ओमकार शिंदे (८५ किलो) या चौघांनी महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकावर नाव कोरले. शुभम आचफळने (५२ किलो) रौप्यपदक जिंकले. सोहम कुंभार (४१ किलो), रोहन पाटील (३८ किलो) यांनी कांस्यपदक प्राप्त केले.

महिलांच्या विभागात महाराष्ट्रासाठी श्रावणी लवटे (३६ किलो), अहिल्या शिंदे (५० किलो), प्रगती गायकवाड (५८ किलो) यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. समीक्षा जाधव (३३ किलो), गौरी पाटील (४२ किलो), जानवी गोडसे (५८ किलो) यांनी कांस्यपदक मिळवले.

‍♂ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राला एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही. या प्रकारात ओम चौगुले (४४ किलो), विनय पुजारी (८५ किलो) यांनी रौप्यपदकाचा वेध घेतला. तर यश रांजणे (४१ किलो), तुषार पाटील (६२ किलो), ओम कराळे (३८ किलो) आणि वैष्णव अडकर (६८ किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Apple कंपनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देणार १००० डॉलर्सचा बोनस.

करोनाचं संकट संपेल असं वाटत असताना नव्या व्हेरिएंटची धास्ती वाटू लागली आहे. ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे पुन्हा एकदा संकटाचे काळे ढग दाटू लागले आहेत. त्यामुळे कार्यालयं आणि शाळा सुरु करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे.

आता अ‍ॅप्पल या कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची मुदत मागे घेतली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी १००० अमेरिकन डॉलर्सचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. खरं तर, अ‍ॅप्पलचे सीईओ टिम कुक यांनी आधी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्ये कर्मचार्‍यांसाठी कार्यालय उघडले जाईल. नंतर १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढविण्यात आला होता.

कंपनीने आठवडाभरापूर्वी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपर्यंत कामावर येण्यास सांगितले होते. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवण्यात आली आहे. पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. करोनाचा उद्रेक पाहता अ‍ॅप्पलने तीन रिटेल स्टोअर्स देखील बंद केले आहेत. बंद करण्यात आलेले स्टोअर्स मियामी, मेरीलँड आणि ओटावा येथे आहेत. अ‍ॅप्पलने त्यांच्या यूएस स्टोअरमध्ये आता मास्क अनिवार्य केलं आहे. यापूर्वी ग्राहकांसाठी मास्क घालण्याचा आदेश काढून घेण्यात आला होता.

मात्र आता पुन्हा हा नियम लागू केला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेतील जवळजवळ अर्ध्या अ‍ॅप्पल स्टोअरमध्ये ग्राहकांना मास्क घालण्याची आवश्यकता नव्हती. दुसरीकडे, अ‍ॅप्पलने म्हटले आहे की, ग्राहक आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क अनिवार्य आहे.

लग्नासाठी मुलीचे वयही २१ वर्षे; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षांवरून २१ वर्षे, म्हणजे पुरुषांइतकेच करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  विवाहाचे समान वय निश्चित करण्यासाठी, निरनिराळ्या समुदायांतील विवाहांशी संबंधित विविध वैयक्तिक कायद्यांमध्ये आनुषंगिक बदल करण्याचाही प्रयत्न सरकार याबाबतच्या प्रस्तावित विधेयकाद्वारे करू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत विवाहासाठी महिलांचे कायदेशीर वय १८ वर्षे, तर पुरुषांचे २१ वर्षे होते. महिलांच्या विवाहासाठी किमान वय किती असावे याबाबत  सरकार विचार करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर वर्षभराने सरकारने हा निर्णय घेतला.

दरम्यान, महिलांचे विवाहाचे वय वाढवणे म्हणजे ‘आजाराच्या कारणापेक्षा त्याच्या लक्षणांवर इलाज करणे आहे’, असे पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. Marathi Current affairs कमी वयात विवाहाबाबत चिंता हे योग्य दिशेने उचललेले पाऊल असले, तरी या मुद्द्यावर कायदेशीर कारवाई करणे म्हणजे ज्यामुळे अशा प्रथा अनेक शतके अस्तित्वात राहिल्या त्या मूळ कारणांचा शोध न घेता लक्षणांवर इलाज करण्यासारखे आहे.

सखोल रुजलेली लैंगिक असमानता, प्रतिगामी सामाजिक निकष, आर्थिक असुरक्षितता, दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधींचा अभाव या सर्वांमुळे कमी वयात आणि सक्तीच्या विवाहाच्या घटना घडतात, असे या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

तर मित्रांनो आमचा Marathi Current affairs वरचा लेख कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट द्वारे कळवा तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आम्ही तुमच्या साठी आजून नवीन पेज आणू आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा

परीक्षेसाठी महत्वाच्या योजना :- जीवन लाभ पॉलिसी

सौर रूफटॉप योजना

ई – श्राम योजना

ग्राम सुमंगल योजना

Leave a Comment