goat uninq info|शेळी |शेळी पालन|goat rearing

By Sandypummy12

 शेळी /Goat

मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत की बकरी शेळी याबद्दल शेळीला गरीबाची गाय असे म्हणतात या एक विशेष अशी माहिती जी आपल्यापैकी बऱ्याच जणांनामाहित असेल किंवा नाही बकरी किंवा शेळी आपण बऱ्याच ठीकानी  गावात बघितलेली असेल. त्या भाकरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत बकरीला नैसर्गिक अशी  देण आहे जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल बकरी शेळी हा प्राणी वर्ग सामान्यता ग्रामीण भागात आपल्याला बघायला मिळतो.

 बकरी पासून होणारे उपयोग आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती पण असेल महाराष्ट्र मध्ये शेळी या नावाने

आपण त्यांना ओळखत असतो नर बोकड म्हणून ओळखला जातो आणि मादि शेळी या नावाने ओळखले जाते

त्यांचा उपयोग

शेळी अथवा बकरा यांचा उपयोग

संजीवन साखळीमध्ये बकरी पासून मिळणारे दूध हे शरीरासाठी उपयोगी असते ग्रामीण भागामध्ये शेळी चे दुध चहा छोट्या मुलांनी सर्दी वगैरे असली त्यांना हळदीमध्ये उकळून शेळीचे दूध देतात शेळीच्या विष्ठेपासून खत तयार केले जाते त्याला लेंडीखत असे म्हणतात लेंडीखत झाडांसाठी उपयोगी असते आपण बऱ्याच ठिकाणी लेंडीखत उपयोगात आणत असतो बकऱ्याचे मास हे मटन म्हणून खाण्यासाठी वापरले जाते इ. गोष्टी मुळे शेळी पण अत्यंत उपयोगी असा प्राणी आहे. 

 

विशेष अशी माहिती

बकरी विषयी आपल्याला अनेक गोष्टी माहिती झाल्या किंवा माहिती असावे आपण असं समजू की आपण बकरी च्या मागे लपलो तरी तर आपल्याला असे वाटेल की बकरी आपल्याला बघू शकणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती नसेल बकरीला एक नैसर्गिक शक्ती त्यांच्या डोळ्यांच्या रूपात आहे त्यांचं  आयताकृती डोळ्यांच्या भागांमधून एक  आडवे दृश्य घेऊ शकते तेदेखील शेवटच्या पूर्ण 3d दृश्य नुसार जर आपण असे समजून आपण शेळीच्या शेपूट पशी पाठी मागच्या साईडला उभे आहोत.ती पाठी मागे मान न वळवता  सरळ मान ठेऊन पाठीमागे बघू शकते. तर ते चुकीचे ठरणार नाही. हे अगदी दुर्मिळ असे प्रकारांमध्ये आहे. असे डोळे निसर्गामध्ये क्वचित विशेषता प्राणी किंवा पक्षी वर्गा मध्ये बगायला मिळते.  बरेचदा या प्राण्यांची  शिकार केली जातात. त्यांच्या साठी निसर्गाने हे वेगळेपण बाहाल केलेले आपल्या दिसते.  जसे की गाय बकरी आणि पक्ष्यांच्या काही प्रजाती स्वभावाने अनोखी वरदान आहे. असा प्रकार   शेळ्या मध्ये अनेकदा लक्षात येतो.  कारण त्यांचे डोळे फिक्कट गुलाबी आहेत. आश्चर्यकारक आहे नर शेळ्या मादि पेक्षा खूप मोठे असतात. निश्चितच आपण त्यांच्या 360 अंशांच्या डोळ्यांपासून कुठेही सुटू शकणार नाही

शेळी पालन (goat rearing)

 हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येतो. शेळी ला गरिबांची गाय असे म्हणतात. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात चारा लागते. साधारणत: एका गाईला लागणार्‍या चाऱ्या खाद्यवर १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे कमी जमीन असणाऱ्या गरीब जमीन मालकांना हा व्यवसाय अतिशय सोईसकर आहे.खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो.

बंदिस्त शेळीपालन(captive goat)

मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.त्यांना विशिष्ट पद्धतीने अन्न देण्याची एक पद्धत असते. बंदिस्त शेळयांची झपाट्याने वाढ होत असते.

अर्ध बंदिस्त शेळीपालन(semi-closed goat rearing)

 मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या जागेत रानात सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतातील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

उत्पन्न

   शेळ्यांची संख्या सुमारे १२३ दशलक्ष  इतकी आहे. तर जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या आहेत.असे जरी असले तरी भारतात शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे.  दूध, मांस व कातडीच्या एकूण उत्पन्नापैकी शेळ्यांपासून फक्त ३% दूध, ४५ ते ५०% मांस व ४५% कातडी प्राप्त होते.

 

धन्यवाद मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल आम्हाला कळवा

 

 

Leave a Comment