Ek Anokhe Prem in Marathi | 1 अनोखे प्रेम

By Sandypummy12

एक अनोखे प्रेम

Ek Anokhe Prem in Marathi

Ek Anokhe Prem in Marathi

Ek Anokhe Prem in Marathi hi ek Marathi story ahi yaa til vichaar purn pane maaje astil kivnaa nastil tari aapn samjun ghyaave Ek Anokhe Prem in Marathi he ek vichaar aani bhavna yanchaa sangam yenaarya paristithishi ani ghadnyaaraa goshti aahe

त्यांचे प्रेम होतं का नाही हे त्याला ही कधी कळलं नाही तीच्याशी बोलण्यासाठी तो नेहमी तरफडत असे. नेहमी तिच्या साठी ची ओढ माला त्याच्यात दिसत होती. तिला एकदा बागण्यासाठी ची ओढ ती एक दिवस पण त्याच्या शी बोली नाही किंवा हसली जरी नाही तरी दिवस भर त्याची जिवाची तडफड-तगमग मी आनुभवली आहे.

हे तिला पण माहीत आसाव. तिला पण हे ठाऊक आहे. त्याच्या बोलण्यातुन वाटत होते. aapn he vaachaat aahat Ek Anokhe Prem in Marathi ya lekhaathil sandrbh aahe

मी त्याच्याशी बोलत असताना बघत असे की त्याच्या मनाच्या खोल दरीमध्ये त्याने तिला एका सुरक्षित स्थान दिले आहे. ते स्थान नेहमीच ती बोलत असताना आग्र भागी येत असे सर्व जग विसरून तीचाशी बोलण्याचा प्रयत्न तो करत असे.

कधी- कधी ती समोर आली की कधी तीचाशी काय बोलावे काय नाही हेच सुचत नव्हते. तिचा आत्मविश्वास ठाम होता आपल्यात हे शक्य नाही.

पण त्याला हे पण ठाऊक होते हा आत्मविश्वास तिचा नाही तो आत्मविश्वास तिच्या भोंवतालच्या वातावरणाचा होता. प्रेम कधी कधी हळू हळू फुलते पण एकदा ते फुले की सर्व बंधने तोडून निगते कुठेतरी तिला पण हे ठाऊक असावं त्यांचे एक ब्रीद वाक्य होते तो नेहमीच बोलत असतो मितवा “ तिचे कर्तव्य तिथे असले ना, तरी तिचे प्रेम ईथे आहे, तिची बांधील कि जरी तिथे असली ना तरी तिचा मितवा इथे आहे” मितवा मित्र, तत्त्वज्ञ,वाटाड्या

या शब्दांनी मनात कुठेतरी घर केलं होतं तिलाही ते कधी कळलंच नाही का? प्रेम होतं की फक्त आकर्षण कि त्या च्या शब्दांवर ती भाळी होती. तू तुजे सर्व हरव पण स्वतः ला हराऊ नकोस ती उदास असली का तिच्या मागे सारखा काय झाले येवडी शांत का?

तिचे एकच उत्तर काही नाही. त्याला हे ठाऊक होते की किनारा आपला नाही हे ठाऊक असून ही फक्त काही क्षणांच्या भेटी साठी हाजारो मैलांचा प्रवास करून येणारी लाट.. तिला क्षणभर जरी समजून घेतलं असतंस तरी माणसांच्या गर्दीत असून असं उदास एकाकीपाण वाट्याला आलं नसत तिच्या @Sonuli3 तिला नेहमी विचारत राहिला अगं तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एवढा असून पण तू तुझ्यासाठी दोन मिनिट पण तुझ्या स्वतःच्या सुखाचा विचार नाही करू शकत का?

कळत तर दोघांना पण होता की आपल्या दोघांचे लग्न झालेले असताना आपण एकमेकांवर प्रेम करणे चुकीचे आहे हो मान्य आहे

पण गळ्यात मंगळसूत्र घातले म्हणून का कर्तव्य असलं बांधिलकी असली पण प्रेमच नसलं तर? मनातल्या शब्दांना वाट करून दिली दोन मिनिटे सुखाने बोलले गेलेले शब्द आपल्या पायऱ्या जपुन टाकलेले पाऊल हे चुकीचं असेलच असे नाही? चूक असेल ही तो पण त्याच्या संसारात सुखी होता ती पण त्याच्या संसारात सुखी होती असं म्हणावं लागेल त्याला ती शरीराने नको होती.

समाजात आजही स्त्री शरीरानेच हवी दोघांनी प्रेम केलं म्हणजे सर्व आलं ह्या गोष्टी प्रत्येक प्रेमात असतातच असं नाही कधीकधी प्रेम हे विचारांवर होतं स्त्री सुंदर आहे. म्हणूनच तिच्यावर प्रेम झालं पाहिजे असं नाही काही नाही ओ.. तिचे बंधन होते मान्य आहे

मोठ्या घारात मुलगी दिली म्हणजे ती सुखातच राहील साफ खोटे आहे मोट्या घराचा पिंजरा मोठा आणि मजबूत असतो. बोलण्यासाठी ची ओढ त्याच्या नजरेत तिला ती फक्त वासनाच वाटत होती का? आपल्यावर कोणीतरी प्रेम करत कोणी तरी आपल्यावर पण जीव ओवाळून टाकऊ शकतो ही भावना ती विसरून गेली असावी खूप आपल्याला कोणीतरी जीव लावनारा पण एक कोणी तरी आहे.

तो या जगा पेक्षा वेगळा आहे. ही भावांना पण खूप सुखावणारी असते. आपल्यासाठी कोणीतरी झुरतय हा आनंद गगनात मावणारा असतो ह्या गोष्टींचा तिला कधी आनंद घेता आला की नाही तो तिच्यासाठी आतुर असायचा तिच्याशी दोन शब्द फक्त मन मोकळे बोलण्यासाठी तो तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला मनसोक्त सांगण्यासाठी तो नेहमीच अधुरा राहिला मला फक्त एवढेच सांगायचे आहे

की तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तीच शरीर त्याला भेटले ही असेल पण त्या शरीराच्या आतील ती भेटली असेल का कधी ?

Leave a Comment