कमल पक्षी: सावळा कमल पक्षी(Bronze-winged Jacana)
कमल पक्षी यांना आपण वेगवेगळ्या नावाने संबोधत असतो ती नावे पुढील प्रमाणे
मराठी मध्ये नीलकमल, जल कपोत
इंग्रजीमध्ये ब्रांझ- विंग जसाना(Bronze-winged Jacana)
शास्त्रीय नाव: मेटोपिडीयस इंडिकस (Metopidius Indicus)
लांबी : 28 ते 31 सेंटीमीटर
त्याचा
माहिती
आकार साधारण तीतर सारखा असतो. लांब पायाच्या पान कोंबडी सारखा हे पक्षी आपल्याला कुमुदिनी कमलीनी किंवा शिंगाड्याच्या तळांवर नेहमीच दिसत असतात. या पक्षांना सहसा शिंगाडे गोळा करणारे स्थानिक लोक किंवा मासेमारी करणारे लोक करणारे जास्त परिचित आहेत. भारतात सर्वत्र आढळणारा हा पाणपक्षी कमळ पक्ष्यासारखी त्याची शेपूट लांब नसते काळपट तपकिरी रंगाची त्याची शेपूट बांडी असते. त्याच्या कांस्य रंगाच्या पाठीवर सुंदर हिरवी झाक मारते डोळ्यावरून सुरू होऊन माने कडे जाणाऱ्या रेखीव पीवळी पट्टी मुळे त्याची ओळख पटते त्याच्या पिवळ्या रंगाच्या सूचीच्या वर म्हणजे कपाळावर नेसर लाल रंगांचा चांदवा एकच कच असते.
संपर्क
प्रत्येक पक्षांमध्ये एक संपर्काची पद्धत असते दोन सावळे कमल पक्षी परस्परांमध्ये संपर्क ठेवण्यासाठी रेकल्यासारखा आवाज काढतात याव्यतिरिक्त सिक– सिक– सिक असा सुद्धा आवाज काढला जातो हा आवाज कळवल्यासारखा वाटतो. नर आणि मादी एक समप्रमाणे दिसतात.
प्रणय
हा सजीवांमधील अविभाज्य घटक आहे निसर्गाचे नियमाना आपण नाकारू नाही शकत
प्रणय कमल पक्षी, डुडरा लावी आणि रंगीत केकस यांच्यासारखीच सावळ्या कमलपक्ष्याची मादी बहुपतीव्रत्ती असते नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाली. नर-मादी विनमुलखाचा ताबा घेतात
नर घरटे करायला सुरुवात करतो लव्हाळी पाणतंण किंवा पांणकाडाच्या दांडयापासून बनवलेले छोटा तरफा म्हणजे घरटं असतं. मादी कधी कधी थेट कमळाच्या किंवा शिंगाड्याच्या पानावर अंडी घालते, या पक्ष्याची अंडी फार सुंदर दिसतात अंड्याचा आकार खेळण्यातल्या भोवऱ्य सारखा असतो. एक प्रकारची तकाकी असलेल्या कांस्य –तपकिरी रंगाच्या कवचावर काळसर रंगाच्या रेगोट्यांचा जाळं असतं अंडी आणि पिलांचे रक्षण करणे भरवणे आणि पिल्लांना भरवण ही कामे नरावर टाकून मादी पसार होते साधारण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात या पक्षाची पूजेच्या सुपारीएवढी दिसणारे पिल्ले टंगळ्या या पायांवर आपल्या बापाच्या मागे–मागे हिंडताना दिसतात नर कमल पक्षी त्यांना संरक्षणाच्या क्लुप्त्या शिकवतो पिल्लं ही जरा विशेष असतात. पिल्लांनी जन्मता:च शारीरिक विकासाची चार टप्पे पार केलेले असतात, त्यांचे डोळे उघडे असतात अंगावर पुरळ असतात अंडी फोडल्यानंतर काही तासातच फिरायला लागतात त्यांना चोचीने भरवावं लागत नाही अशा पिल्लांना स्वावलंबी अशी संज्ञा आहे सावळा कमल पक्षी शेपटीच्या कमळ पक्षी आदिवास खाद्य सवयी आणि वागणूक जवळजवळ सारखे असते पुष्कळदा हे दोन्ही जातीचे कमल पक्षी रस्त्यावर दिसतात