हसरे दु:ख-भा. द. खेर |Hasre Dukha | Marathi book review

By Sandypummy12

  हसरे दु:ख-भा. द. खेर |Hasre Dukha | Marathi book review           

हसरे दु:ख |Hasre Dukha | Marathi book review
Hasare Dukkha – राजहंस प्रकाशन

व्यक्तिगत विचार

हे पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर चार्ली  चापलीन यांचे हास्यविनोद करताना चा चेहरा समोर आणून एक गोष्टीचा नक्कीच विचार करा हा माणूस पुर्ण जगाला हसवतो त्याच्या मागचे हे दुःख किती कठीण असेल याचा कधी विचार तरीसुद्धा केला असेल  का आपण  जगातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कोणते ना कोणते दुःख असते.  प्रत्येकाच्या आयुष्यात पण एक पुस्तक बनवू शकत पण त्या संघर्षातून पण कर्तृत्व जर साध्य नाही झाले तर  आपण केलेल्या संघर्षाला योग्य तो मान मिळत नसावा मिळत नाही.  आयुष्यभर फक्त रडत बसण्यात अर्थ नाही आपण आयुष्य जगताना जे कष्ट घेतले आहे ती तळमळ तडफड  आईवडिलांची मेहनत कष्ट ह्या गोष्टींचा विचार कुठेतरी करून आपण आयुष्यात सक्सेस होण्यासाठी या प्रकारे मेहनत करायचे हे आपणास या पुस्तकांमधून शिकवन भा.  द.  खरे  यांच्या भाषा शैली चा अप्रतिम  जोड पुस्तक वाचताना आपल्यासमोर उभे राहणारे ते चित्र जणू ते आपल्या समोरच चालू आहे आणि आपण विणगे मधून  बघत आहोत असा भास होतो जणू  असेच पुस्तक आपल्यासमोर  भा.  द.  खेर यांनी  सूचक  भाषे मध्ये  आपल्यासमोर सादर केलेले आपणास दिसते आहे हे पुस्तक आयुष्यात एकदा तरी वाचले पाहिजे नक्कीच छान आहे

हसरे दुःख पुस्तकातील योग्य जागेवरील विचार 


 माझा आयुष्यच नाट्यमय आहे तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच त्यातील सर वास्तव्य मी स्वतः अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात नकळत मी लोकांना जीवनातील दुःख दाखवून देतो आपल्या हसरा मुखवटा त्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंत यांच्या आयुष्याची कहाणी

चार्ली आणि त्याची आई त्यांचा एक संवाद 

चार्ली :-  “श्रीमंतांनी आपल्या तोंडातला अर्धा घास गरिबांना द्याला  काय हरकत आहे? श्रीमंतानी जास्त खाऊन आपली पोट फुगवण्यापेक्षा गरिब  खपाटीला गेलेल्या पोटात ते जादा अन्न घालायला काय हरकत आहे?”

हॅना म्हणाली, “अरे, तसं झालं तर पृथ्वीवरच सुखाचा स्वर्ग निर्माण होईल जेव्हा घडेल तो सोन्याचा दिवस ठरेल… पण…”

काही वेळ थांबून हॅना पुढे म्हणाली, “अरे, तेवढं तरी हवंय कशाला? माणसं अन्नापेक्षाही प्रेमाला भुकली असतात. दरिद्री माणसांना आज तरी आपण  प्रेम देऊ शकतो. चार्ली, पुढेमागे तू नक्की मोठा होशील. मोठा झाल्यानंतर लोकांना तू प्रेम दे. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कर. त्या लोकांच्या भूमिकेत जाण्याचा प्रयत्न कर तू धर्मगुरू झालास तर तुला ते करणं – शक्य होईल. प्रिस्ट होऊन येशूचा शांततेचा संदेश जगभर फैलावण्याचा प्रयत्न कर 


पुस्तकातील अप्रतिम भाषा 

रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रेक्षागृह एकदम शांत झालं. वाद्यवृंदाचे स्वर घुम् लागले. प्रेक्षागृहातली कुजबूज एकदम थांबली.


रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हाले एकतानतेनं गात उभी असलेली देसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली, आणि वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जिवाचा कान करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय श्रुतिमूर्ती साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं.


लिली हालेचा पाच वर्षाचा घाकटा मुलगा चार्ली विंगेमधे उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे मोठ्या प्रेमानं बघत तो निल उभा होता.


लिली हालेचं गाणं ऐन रंगात आलं. तिच्या गोड गळ्यातून तारसप्तकातले स्वर सहजतेनं बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुयानं श्रोते डोलू लागले. फुलून गेले. लिली हालेंचा तारसप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना, स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना.


बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. आपल्या कंठातून स्वर प्रगट करण्याची तिची धडपड चालूच होती. विद्ध झालेल्या एखाद्या चंडोल पक्ष्यानं आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड


करावी, अशासारखं ते केविलवाणं दृश्य दिसत होतं. त्या दिवशी कित्येक रांगडे सैनिक प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते. लिली हालेंचे ते फार चाहते होते. ‘काय झालं?’… एकदम असं काय झालं?’ अशी त्यांची


आपापसात कुजबूज सुरू झाली. परंतु तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं, हे तिचं तिलाही कळत नव्हतं. मग या रांगड्या सैनिकांना कुठून कळणार?


आपण हे पुस्तक वाचले आसतील तर हे पुस्तक वाचून तुम्हाला काय भेटले किंवा काय अनुभव होता हे आम्हाला Comment

Box मध्ये कळवा


Leave a Comment