मुलांचा यौवनारंभ/लैंगिक शिक्षण/Sexual intercourse in Marathi

By Sandypummy12

मुलांचा यौवनारंभ/लैंगिक शिक्षण/Sexual intercourse in Marathi 

मुलांचा यौवनारंभ/लैंगिक शिक्षण/Sexual intercourse in Marathi
बाल्यावस्था व प्रौढावस्था यांच्यातील संक्रमणकाल म्हणजे पौगंडावस्था. अंतर्बाह्य बदल घडवून आणणारा व तसाच भावनिक तुफानाचा हा कालावधी. या कालावधीला सीमा नाहीत. शारीरिक व मानसिक बदल एकाच वेळी होत नाहीत. वाढीची प्रक्रिया शरीरातील सर्वच अवयवात एकाच वेळी होत नाही व एकाच वेळी संपतही नाही. सर्वसाधारणपणे पौगंडावस्था चार वर्षे टिकते.

मुलांचा यौवनारंभ
मुलांच्या बाबतीत हा बदल वयाच्या बारा ते चौदा वर्षांच्या दरम्यान सुरू होतो व क्याच्या सुमारे सोळा ते अठराव्या वर्षी पूर्ण होतो. हा जरी नियम असला तरी मुलात लवकरात लवकर दहाव्या वर्षों व उशिरात उशिरा सोळाव्या वर्षी यौवनारंभ झाल्याची उदाहरणे आहेत. वाढीची प्रक्रिया विसाव्या वर्षापर्यंत चालू राहू शकते..

प्रथम जघन भागात, वृषण कोशावर व काखेत केस यायला लागतात, मिसरूड दिसते.दाढीची लव तयार होते. झोपेत वीर्यस्खलन होते. एखाद्या दिवशी हस्तमैथुन करीत असताना शिश्नातून लहरी उत्पन्न होतात व मूत्रमार्गाच्या टोकाला एक थेंब वीर्य दिसते. मुलाची उंची वाढू लागते. स्नायूत वाढ होऊन ते मजबूत होतात. मुलाचे खांदे रुदावतात.स्तनात गाठ निर्माण होते. ही गाठ फार दुखरी बनते. पुढे कालांतराने ती आपोआप नाहीशी होते. या वेळी मुलांच्या वजनातही वाढ होते. त्यांचा आवाज फुटतो व गळ्यातली घांटी वाढते.

मुलांच्या वृषणात टेस्टोस्टेरॉन या पुरुष जन्य संप्रेरकाच्या (हॉर्मोन) निर्मितीला सुरुवात होते. ही निर्मिती वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत वाढत जाते. मुलाचे पुरुषात रूपांतर होते ते या हॉर्मोनमुळे. टेस्टोस्टेरॉनचे हे प्रमाण पुढे उतारवयात कमीकमी होत जाते. तरीही आयुष्याच्या शेवटपर्यंत या हॉर्मोनची निर्मिती संपूर्णपणे थांबत नाही.

टेस्टोस्टेरॉनमुळे मुलाचे शिश्न लांब व जाड होते. कामोद्दीपक भावनांमुळे शिश्न ताठ होऊ शकते. वृषण व इतर अंतर्जननेंद्रियांची वाढ होते. वृषणात शुक्राणू तयार होतात. जननेंद्रियावरील केस, दाढी मिश्या, स्वरयंत्रातील बदल हे सर्व काही टेस्टोस्टेरॉन मुळे असते.

छातीवर व बेंबीखालून जघन भागापर्यंतच्या मध्यरेषेवर केस येणे हे पुरुष वैशिष्ट्य असते. (सियांना फक्त जघन भागात त्रिकोणाकृती जागेतच केस येतात.) याच वेळी शरीराची त्वचा जाड होते व त्वचेतून बाहेर पडणाऱ्या तेलकट (‘सिबम’) चे  प्रमाण वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर तारुण्यपीटिका (मुरमे) उद्भवतात.

भावनिक विकास या वयात झपाट्याने होतो. मुलाला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्राप्त होत आपण प्रौढ झालो आहोत व आपली समज वाढली आहे असे त्याला वाटत.कोणत्याही विषयावर तो आपले मत मांडतो. त्याच्या पोषाखात नीटनेटकेपणा येतो. सिनेमा, नाट्या,नाटके अशा विषयात त्याला रस निर्माण होतो. मुले प्रेमात पडतात, पण त्यांचे प्रेम फुलपाखरासारखे असते. आपले प्रेमपात्र वारंवार बदलतात.

या वयात कामविषयक आवड निर्माण होते. मुलिंकडे पाहणे त्याला आवड्ते. त्यांचा संपर्क हवासा वाटतो. मुलींचा स्पर्श, ब्ल्यू फिल्म, नम्र चित्रे, सिनेमा कादंबऱ्यांती या वयात कामविषयक आवड निर्माण होते. मुलींकडे पाहणे त्याला आवडत त्याला आवडते. त्याचा कामुक प्रसंग यामुळे त्याचे शिस्न ताठ होते, छातीत धडघडते, कानशिले गरम होतात कामवासनेचा असा हा तनाव तो हस्तमैथुनाने कमी करतो, त्यामुळे त्याला कामपुर्तिचा त्याला अनुभव येतो.

प्रजोत्पाद्नश्मता या वयात येते.मित्रान बरोबर काम विषयावर बोलने त्याला आवडते. आपण संभोग करीत असल्याची स्वप्ने पडतात. अधून मधून झोपेत विर्यस्खलन होते. मुले ह्स्तमैथुन करतात. संभोगाची संधी शोधतात, पण कुणा एकीशी पुढे विवाह करने हा हेतू नसतो. मजा मारण्यासाठी कुणीही मुलगी चालते.. या वयात मुलाना दिवास्वप्ने रंगविणे आवडते. ते वारंवार आरशात पाहू लागतात चेहरा, केस, आपले वजन, कपडे या विषयाना फाजील महत्व देतात. स्वतःच्या वाड्त्या शरिराची ओळख करुन घेणे,  हस्तमैथुन व झोपेतील वीर्यस्खलनामुळे अपराधी मनोभाना होणे.वार्नवार शिश्नाआचे उधिप्प्न होणे, मुलीचे आकर्षण यात गुंतल्यामुळे अभ्यासा कडे दुर्लश होण्याचा संभव असतो.

डॉ, विठ्ठ्ल प्र्भु

Leave a Comment